राज्यात ठाकरे, पवारांसाठी सहानुभूतीची लाट

मुंबई: आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज महायुतीलाच घरचा आहेर दिला.आहे. निवडणूक एन टप्यात असतानाच राज्यात उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानभुतीची लाट असल्याचे भुजबळ यांनी जाहिरपणे मान्य केले आहे. काही दिवसांपुर्वी मी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडून पुन्हा सत्तेत आलो असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांचे हे कृत्य महाराष्ट्राच्या जनतेला पटले नाही याची अप्रत्यक्ष कबुलीच भुजबळ यांनी दिली. भुजबळ यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये 400 पारचा नारासुध्दा अडचणीत असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात महायुताली २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणूक जितकी सोपी गेली तितकी सोपी नसेल. त्यांनी ४८ पैकी ४१ लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. भाजपाने २३ तर एकसंध शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असल्याने तसा विजय मिळविणे सोपे नाही असेही ते म्हणाले. असे असले तरी  “लोकांचा विश्वास अजूनही नरेंद्र मोदींवर आहे आणि त्यांनी एक मजबूत सरकार बनवावे अशी त्यांची इच्छा असल्याचेही भुजबळ म्हणाले.

 ‘मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकचा उमेदवार जाहीर करा

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे धडाक्यात प्रचार करीत आहे. तर दुसरीकडे अजुनही महायुतीने येथे उमेदवार घोषित केलेला नाही. महायुतीत मात्र नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीलाच खोचक टोला लगावला आहे. २० मे हा नाशिक लोकसभेच्या मतदानाचा दिवस आहे. तोपर्यंत तरी येथे उमेदवार जाहीर करावा, असे भुजबळ म्हणालेत.

नाशिकच्या जागेवर महायुतीच्या तीनही पक्षांनी दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावला आहे. नाशिकमधून लोकसभा लढवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ देखील इच्छुक होते. मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर माघार घेतली. मात्र त्यानंतर देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाने नाशिक जागेवर दावा सोडलेला नाही. तसेच भाजपची नाशिकमध्ये जास्त ताकद आहे, असे सांगत भाजपने देखील या जागेवर दावा ठोकलेला आहे.

मला वाटलं माझ्यामुळे अडचण होत आहे. त्यामुळे मी निवडणुकीतून दूर झालो. आता अर्ज भरायला देखील सुरुवात झाली आहे. 20 मे हा नाशिक लोकसभेच्या मतदानाचा दिवस आहे. तोपर्यंत तरी येथे उमेदवार जाहीर करावा, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच महायुतीत आम्ही एकत्र काम करणार आहोत. नाशिक आणि दिंडोरी दोन्ही जागा आम्ही निवडून आणू, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *