मुंबई : महाराष्ट्रात आदर्श लोकसभा लागू होताच निवडणूक आयोगाकडून त्याची कडक अंमबाजवाणी सुरु आहे. निवडणूकीच्या काळात पन्नास हजार रुपायांहून अधिकची कॅश सोबत बाळगण्यास बंदी आहे. आणि ती सोबत असेल तर त्याबाबतची संबधित कागदपत्र सोबत असणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर होण्याची शक्यता असते. म्हणूुनच हे नियम बनविण्यात आले आहे. अशातच मुंबईच्या भांडुपच्या सोनापूर विभागात मध्यरात्री निवडणूक भरारी पथकाने सुमारे तीन कोटी रुपये ताब्यात घेतले होते आणि त्याचा तपास सुरु होता.
भांडुप पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री सिक्युर कंपनीची गाडी जप्त केली होती. पोलिसांना संशय आल्यामुळे ती व्हॅन ताब्यात घेण्यात आली होती. गाडीमध्ये पैसे होते आणि त्यासंदर्भातील कागदपत्रे कमी होती. पोलीस तपासानंतर आढळलं आहे की, ही गाडी रोज एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी जात असते, ही गाडी घाटकोपर, मानखुर्दपर्यंत जाते. त्यात एकूण 2 कोटी 25 लक्ष 3 हजार रुपये सातशे रक्कम आढळली. यासंदर्भात पुढील चौकशी सुरु आहे.