ठाणे : उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मढवी यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एम के मढवी आणि अनिल मोरे यांना खंडणी विरोधी पथकाकडून त्यांना अटक करण्यात आली होती. राजकीय सुडबुद्धीने ही अटक करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. शिंदेसेनेत दाखल न झाल्यामुळे त्यांना अटक केली असा ठाकरे गटाचा आरोप आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे २९ एप्रिल रोजी अर्ज भरणार आहेत. दरम्यान, राजन विचारेंसोबत निष्ठावंत असणारे एम के मढवी मात्र पोलिसांच्या ताब्यात आहेत. राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणात असतानाच त्यांचे शिलेदार अडचणीत आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय.