कल्याण : थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या जयंती दिनी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापौर हर्षाली चौधरी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सचिव कार्यालयातील अधीक्षक भोये व अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता
