मुंबई : मुंबई-मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त माता रमाई स्मारक वरळी मुंबई येथे बुध्द वंदनासह अभिवादन सभेमधून मानवंदना त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांना  हजारोंच्या संख्येत उपस्थितीत आंबेडकरी आनुयाकडून देण्यात आली. सदर प्रसंगी माता रमाई आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर दर्शनाताई भिमराव आंबेडकर व रिपब्लिकन सेना सरसेनापती सन्माननीय आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेब, माजी समाज कल्याण राज्यमंत्री, आमदार विजय गिरकर, माता रमाई स्मृती प्रतिष्ठान रजि.वरळी मुंबई अध्यक्ष अमोल सांळुखे महासचिव महेंद्र सोनावणे, उपाध्यक्ष सिध्दार्थ खंडागळे, सचिव प्रकाश डोळस, कोषाध्यक्ष विशाल गायकवाड, वैभव मोहिते, आदिच्या परिश्रमातून अभिवादन कार्यक्रम भरगच्च संपन्न झाला.सदर वेळेस आंबेडकरी चळवळीतील भिमसैनिक समाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सर्वश्री प्रतिक कांबळे यांच्यासह  समाजभूषण बौध्दाचार्य सो.ना.कांबळे,नागसेन कांबळे,रवि गरुड, संजय भालेराव, समाजभूषण योजना ठोकळे,शांतु डोळस, बौद्धाचार्य संजय ओव्हाळ, तुषांत रुके, श्रीकांत भिसे,किरण निकम, रमाकांत जाधव, अॅड अजय कुमार भोसले,मनोज मर्चंडे, दिपक थोरात, विनोद माने, अमोल निकाळजे, आदि  आंबेडकर चळवळीतील  मान्यवरांकडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केल्याचे मुक्त पत्रकार समाजभूषण बौध्दाचार्य सो.ना.कांबळे गुरुजी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *