हरियाणाचा हर्षल उपांत्य फेरीत
मुंबई : अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाच्या हर्षल राणाने दमदार झुंजार खेळ करत कर्नाटकच्या आर्यमन सिंगला चार गेममध्ये पराभूत केले. वांद्रे पश्चिम येथील ऑटर्स क्लबच्या स्क्वॉश कोर्टमध्ये गुरुवारी दोन १५ वर्षीय प्रतिभावान खेळाडूंमध्ये वर्चस्वासाठी तीव्र चुरस पाहायला मिळाली. गेल्या वर्षीचा ज्युनियर राष्ट्रीय विजेता हर्षल पहिला गेम हरला. पण डावपेचात्मक खेळ करत त्याने पुढील तीन गेम जिंकताना ६-११, ११-६, १२-१०, ११-९ असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. अव्वल दोन मानांकित खेळाडूंपैकी, श्रेयांश झा याने प्रदीपसिंग राठोडचा ११-६, १२-१०, ११-३ असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित अगस्त्य राजपूतने अगस्त्य बन्सलवर ११-८, ३-११, ११-९, ११-३ अशी चार गेममध्ये मात केली.
निकाल (१३ वर्षांखालील मुली – उपांत्यपूर्व फेरी): १-ईशा शेळके विजयी वि. सीरत घुमन ११-२, ११-5, ११-4; श्रिया माहेश्वरी विजयी वि. रुही लोढा ११-२, ११-२, ११-5; अक्षरा माखिजा विजयी वि. अरणा राव ११-७, ११-३, ११-८; २-आध्या ग्रोव्हर विजयी वि. सानवी तिडके ११-9, १0-१२, ११-9, ११-६.
१३ वर्षांखालील मुले: झेन अली विजयी वि. निर्वाण उप्पल १0-१२, ११-८, 9-११, ११-4, ११-३; निर्मान चमरिया विजयी वि. निर्वाण पारिख ११-4, 5-११, ११-9, ११-5; रिदान गुप्ता विजयी वि. कृशिव मित्तल ११-७, ११-5, ११-१; आर्यन एस के. विजयी वि. अरित्रा देबनाथ ११-9, ११-८, ११-७.
१५ वर्षांखालील मुली : शनाया रॉय विजयी वि. समीरा गोरसिया ११-६, ११-4, ११-9; नंदिकाश्री कलैवनन विजयी वि. रायशा नाईक ११-१३, ११-८, ११-5, १0-१२, ११-9; २-त्रिशा शहा विजयी वि. एकम घुमन ११-२, ११-5, 5-११, ६-११, ११-२. मुले: रुआन राम तडंकी विजयी वि. आर्यन प्रभू ११-5, ११-६, 4-११, १२-१0; विनय शिंदे विजयी वि. ऋषभ श्याम ११-६, 5-११, ११-9, ८-११, ११-६; फरीद अंद्राबी विजयी वि. प्रभू बाजोरिया ११-9, ११-5, ११-६; अयान धनुका विजयी वि. २-वेदांत अग्रवाल ११-4, ११-६, ३-११, ११-६.
१७ वर्षांखालील मुली : वसुंधरा नांगरे विजयी वि. आरवी रैना ११-१, ११-5,११-5; फबिहा नफीस विजयी वि. अहाना सिंग 9-११, ११-६, 9-११, ११-३, ११-८; देवश्री अरोरा विजयी वि. अनुष्का जोहरी ११-८, ११-5, १4-१२; २-आरिका मिश्रा बीटी अमायरा मेहता ११-4, ११-६, ७-११, ११-२;
मुले : १-श्रेयांश झा विजयी वि. ११-६, १२-१०, ११-३ प्रदीपसिंग राठोड; हर्षल राणा विजयी वि. आर्यमन सिंग ६-११, ११-६, १२-१0, ११-9; सहर्ष शहारा विजयी वि. इंद्रांशसिंग राकेश बडगुजर ११-5, ११-4, १२-१0; २-अगस्त्य राजपूत विजयी वि. अगस्त्य बन्सल ११-८, ३-११, ११-9, ११-३.
000000000
