१५वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा
मुंबई : एएचडब्ल्यूए आयोजित १५व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेत (२०२६) पुरुष एलिट गटात मध्य रेल्वेने मुंबई पोर्ट अथॉरिटीवर ३-२ असा निसटता विजय मिळवला. वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलच्या टर्फ मैदानावर खेळल्या गेलेल्या स्पर्धेत मध्य रेल्वेकडून युवराज वाल्मिकी, जोगिन्दर एस., श्रेयस डी. यांनी प्रत्येकी एक गोल केला. प्रतिस्पर्धी मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून तल्ला राजू आणि रामा आरने गोल केला. त्यापूर्वी, १६ वर्षांखालील मुलांच्या गटात डॉन बॉस्को एससीने इंडिपेंडेंट एससी २-० असे हरवले. विजयी संघाकडून ऋग्वेद कोटकर, अर्णव खोटने गोल केले.
निकाल – फ्युचर चॅम्प्स: डुरुएलो एससी १ (आर्या जाधव) विजयी वि. गुरुनानक देव अकादमी ०.
१६ वर्षांखालील मुले: डॉन बॉस्को एससी २ (ऋग्वेद कोटकर, अर्णव खोट) विजयी इंडिपेंडेंट एससी 0.
एलिट पुरुष: सेंट्रल रेल्वे ३ (युवराज वाल्मिकी, जोगिंग्डर एस., श्रेयस डी.) विजयी वि. मुंबई पोर्ट अथॉरिटी २ (तल्ला राजू, रामा आर.). सीटीसी ‘अ’ 5 (गोविंद नाग २, देविंदर वाल्मिकी, मनप्रीत सिंग, आकाश राय) विजयी वि. रिपब्लिकन एससी 0. व्हेटरन्स पुरुष: मुंबई कस्टम्स २ (लक्ष्मण राव, लिंकन टेट्स) विजयी वि. मुंबई पोर्ट ट्रस्ट 0.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *