जागतिक तंबाखू निषेध दिन
मिरा -भाईंदर :जागतिक तंबाखू निषेध दिन निमित्त वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड तंबाखू आणि निकोटीनच्या व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक परिणामांविषयी महिनाभरापासून  जनजागृती करत आहे. यावर्षीची संकल्पना “ तंबाखूच्या आकर्षणामागील सत्य उघड करा: निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाला प्रतिबंध करा” अशी असून, ई-सिगारेट, व्हेप्स आणि निकोटीन पाऊच सारख्या उत्पादनांमुळे तरुणांमध्ये वाढणाऱ्या निकोटीन व्यसनाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतामध्ये २६.७ कोटींहून अधिक तंबाखू सेवन करणारे नागरिक असून, तंबाखू हे कर्करोग, हृदयविकार, स्ट्रोक, श्वसनविकार आणि अकाली मृत्यूचे प्रमुख टाळता येण्याजोगे कारण आहे. याबाबत बोलताना मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे डॉ. प्रियांक चवाथे कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरी तज्ञ  म्हणाले,”तंबाखूमध्ये हजारो घातक रसायने असतात, ज्यांपैकी अनेक कर्करोग निर्माण करणारी आहेत. ही रसायने शरीरातील पेशींच्या डीएनएला हानी पोहोचवून तोंड, जीभ, घसा, अन्ननलिका, फुफ्फुसे, स्वादुपिंड आणि मूत्राशयासह अनेक अवयवांच्या कर्करोगाचा धोका वाढवतात. विशेषतः चिंतेची बाब म्हणजे आधुनिक उत्पादनांच्या माध्यमातून तरुणांमध्ये निकोटीनचे सेवन वाढत आहे. ही उत्पादने सुरक्षित पर्याय म्हणून सादर केली जात असली तरी ती आयुष्यभराच्या व्यसनाला कारणीभूत ठरू शकतात.”
जागतिक तंबाखू निषेध दिन २०२६ निमित्त वोक्हार्ट हॉस्पिटल् सर्व नागरिक, कुटुंबे, शैक्षणिक संस्था आणि धोरणकर्त्यांना आवाहन करते की त्यांनी एकत्र येऊन तरुण पिढीला निकोटीनच्या व्यसनापासून संरक्षण द्यावे आणि भारतासाठी अधिक निरोगी व तंबाखूमुक्त भविष्य घडवावे.
०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *