पोलिसांकडून फक्त गुन्हा नोंदविण्याचा सोपस्कार
ठाणे – ठाणे शहरात प्राण्यांच्या डाॅक्टरला विचित्र समस्येला सामोरे जावे लागत आहे. अवघ्या वर्षभरात एकाच चोरट्याकडून दवाखाना फोडून दवाखान्यातील किमती ऐवज लंपास केला जात आहे. मात्र, पोलिसांकडून फक्त गुन्हा नोंदविण्याचा सोपस्कार केला जात असून चोरट्याला जेरबंद करण्याची कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याचे उघडकीस आले आहे.
कावेसर येथे डॉ. ओंकार अमीर पावसकर यांचा प्राण्यांचा दवाखाना आहे. त्यांच्याकडे दोन सहाय्यक नोकरीस आहेत. या दवाखान्यात प्राण्यांची आरोग्य तपासणी, औषध वितरण केले जाते. तसेच, श्वान आणि मांजरींसाठीचे खाद्य विकण्यात येत असते. सन २०२५ च्या एप्रिल महिन्यात डॉ. पावसकर हे आपला दवाखाना बंद करून गेले असता, एका अज्ञात इसमाने दवाखान्याचे शटर उघडून दवाखान्यात असलेली रोकड आणि प्राण्यांचे खाद्य लंपास केले होते. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वर्षभरात या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश न आल्याने भीड चेपलेल्या चोरट्याने गुरूवारी पहाटेच्या सुमारास या चोरट्यांनी पुन्हा दवाखान्याचे शटर उचकटून दवाखान्यातील रोकड आणि मांजरींचे खाद्य असा 96 हजारांचा ऐवज लंपास केला . तसेच, दवाखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरा देखील तोडले. मात्र, एका कॅमेरात या चोरट्याच्या हालचाली कैद झाल्या असून दोन्ही चोरीप्रकरणातील चोर एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात बीएनएस ३३१(४), ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तीन दिवसांनंतरही गुन्हेगार फरार आहे.
०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *