अहिल्यानगर : माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, माध्यम विभाग प्रमुख गोविंद येतयेकर आदी उपस्थित होते.  तनपुरे हे २०१९ मध्ये राहुरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये तनपुरे राज्यमंत्री होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, राहुरी मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी मी माझ्या सहकाऱ्यांसोबत प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा त्या विधानसभा मतदार संघातील तिन्ही तालूक्यातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे. वर्षानुवर्षे समाजातील अनेक घटकांसोबत त्यांनी काम केले आहे. ज्या विश्वासाने  तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. भाजपा संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाहीही  चव्हाण यांनी दिली .
यावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील वीज, शेती आणि पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक होईल. पक्ष भविष्यात जी काही जबाबदारी सोपवेल ती उत्तमप्रकारे पार पाडेन.
यावेळी राहुरी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, अहिल्यानगर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राहुरी उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वाचकर, राहुरी तालुका युवक शहर अध्यक्ष संतोष आघाव, पाथर्डी उपाध्यक्ष जालिंदर वामन, अंबादास डमाळे, राहुरी पंचायत समिती माजी उपसभापती बाळासाहेब लटके, राहुरी पंचायत समिती माजी उपसभापती रवींद्र आढाव, किसनराव जवरे, प्रभाकर गाडे, नंदराज पाटील, अजय जाधव, गोरखनाथ पवार, महेश पानसरे, महेश उदावंत, ओंकार कासार, चंद्रकांत पानसंबळ, सोहम प्राजक्त तनपुरे, अनेक नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
००००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *