ठाणे : महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे १ ते ८ मे दरम्यान ठाणे प्रिमियर लीग २०२४ आयोजन करण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यतेने दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रंगणाऱ्या या लीगचे यंदा १२ वे वर्ष असून आयपीएल आणि रणजी करंडक स्पर्धेतून खेळलेले क्रिकेटपटू लीगमध्ये खेळणार असल्याने ठाणेकरांना रंगतदार लढती पहायला मिळणार असल्याचे महाराष्ट्र माझा सेवा संस्थेचे सल्लागार विकास रेपाळे यांनी सांगितले.

आठ दिवस रंगणाऱ्या या लीगमध्ये १६ संघाना सहभाग देण्यात आला आहे. त्यात एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ आणि ब संघ, एसआरर्स ग्रुप, एफटीएल एकादश, स्पोर्ट्समन ग्रुप, यूनियन क्रिकेट क्लब, गोल्डन स्टार क्रिकेट क्लब, ए टी  स्पोर्ट्स, अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब, बेनेटन क्रिकेट क्लब, ईगल इन्फ्रा,साळगावकर क्रिकेट  क्लब, ठाणे वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी, क्रिकेट मंत्रांज, बॉईज क्रिकेट क्लब, महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी आदी संघाचा समावेश आहे. या संघामधून आयपीएल खेळलेले अखिल हेरवाडकर, अंकित चव्हाण, रोहन राजे, आशय सरदेसाई, कौस्तुभ पवार, विनायक भोईर, धृमील मटकर, सुवेद पारकर, मोहित अवस्थी, परिक्षित वळसंगकर,विद्याधर कामात,शशिकांत कदम, साईराज यादव,सागर मिश्रा,अमन खान  हे क्रिकेटपटू खेळणारआहेत. स्पर्धेतील विजेत्यांना ९९,९९९ रुपये आणि उपविजेत्यांना ५५,५५५ रुपयांचे रोख बक्षीस  देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेतून याआधी खेळेलेला  हरमित सिंग हा सध्या अमेरिकेच्या राष्ट्रीय संघातून खेळत आहे. शशांक सिंग आयपीएलमध्ये आपली छाप पाडत आहे. अनेक दर्जेदार क्रिकेटपटूंचा खेळ ठाणेकरांना मोफत जवळून भेट येणार असल्याचे विकास रेपाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *