आंतरवाली सराटी: मराठा आरक्षणासाठी आणि सगेसोयऱ्यांच्या आग्रहासाठी सहा कोटी मराठ्यांची आता ९ एकरात सभा घेणार आहे यासाठी येत्या १ मेला नारायण गडावर आमची बैठक होणार आहे. या बैठकीची संपूर्ण महाराष्ट्रात तयारी सुरु आहे, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सांगितले.
सहा कोटी मराठ्यांची ९ एकरात सभा होणार आहे. नियोजनाची, तयारीची अंतिम बैठक देखील होणार आहे. ३ मे रोजी तयारीसाठी बैठक होईल. समज गैरसमज असल्याची गरज नाही. मी राजकारणात नाही आणि राजकारणाचा माझा संबंधही नाही. मी ना महायुतीला निवडून द्या म्हटलं ना महाविकास आघाडीला निवडून द्या म्हटलं. कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. परंतु पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. निवडून यावे, उभे राहावे, असं काही नाही. मराठ्यांना पाडायलाही शिकलं पाहिजे, असं आवाहनही मनोज जरांगेंनी केलं.
जो सगे सोयऱ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने आहे, त्याला सहकार्य करा
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, जो सगे सोयऱ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने आहे, त्यांना मराठा समाजाने सहकार्य करावे. मराठ्यांची ताकद दाखवणे, खूप गरजेचे आहे. त्यांना काय इशारा द्यायचा तो गेला आहे. मराठा समाज स्वत:च्या मुलाच्या बाजूने असणार आहे. आमचा कोणताही उमेदवार नसल्यामुळे समाजाचा नाईलाज आहे. त्यांना पर्याय नाही. परंतु मराठा समाज यावेळी बरोबर कार्यक्रम दाखवणार आहे. धनंजय मुंडेंना गोरगरिबांची जाणीव नाही. राजकारण करायचे असते तर मराठ्यांनी त्यांच्या चार पिढ्यांना निवडून दिलं नसतं. आजही मराठा समाज त्यांना विरोधात मानत नाही. त्यांच्या काही लोकांना मराठ्यांचा द्वेष आहे. त्याच्यात बदल केला तर बर होईल. विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासून करतोय,असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
