निवडणूकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांचे शाब्दिक वार
पुणे : महाराष्ट्रात निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून आरोप प्रत्यारोपांचा अक्षरशा धुराळा उडाला आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी लाखोंच्या गर्दीपुढे सभा गाजवताना महाराष्ट्रात एक अतृप्त आत्मा आहे. जो गेली ४५ वर्षे महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी भटकत असतो, अशा शब्दात शरद पवारांवार जहरी टीका केली. यावर पलटवार करताना शरद पवारांनी गुजरात दंगलीमध्ये स्त्रीयांची अब्रुच्या लुटेरेंचे सत्कार करणाऱ्या मोदी सरकारला मत मागण्याचा अधिकारच नसल्याचा घणाघाती आरोप केला. एकुणच महाराष्ट्रातील मंगळवार हा अतृप्त आत्मा आणि गुजरातमधिल स्त्रीयांच्या अब्रुचे लुटेरे या विशेषणांनी गाजला… आरोपांच्या या रणधुमाळीत सामान्य नागरीकांचे प्रश्न मात्र मागे पडल्याचे पहायला मिळाले.
लीड १ मोदींचा फोटो
पुणे : पुण्यातील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या प्रचारार्थ सभेत शरद पवारांवर शाब्दिक हल्लाबोल केला. महाराष्ट्रात एक अतृप्त आत्मा भटकतोय. गेली ४५ वर्षे राज्यातील सरकार हा आत्मा अस्थिर करण्याचा प्रयत्न करतोय. अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शरद पवारांवर जहरी टिका केली. या भटक्या आत्म्याने १९९५ सालचे महायुतीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आणि २०१९ मध्येही या आत्म्याने जनादेशाचा अपमान केला होता. आता हा अतृप्त आत्मा कुटुंबात कलह करतोय असेही मोदी यांनी सांगितले. आजच्या पुण्याच्या भाषणात मोदींचा रोख शरद पवारांवर होता.
पुणे तिथे काय उणे असे म्हणत या भूमीवर महात्मा फुले, जोतिबा फुले यांच्यासारखे समाजसुधारक दिले. पुणे जेवढं प्राचीन आणि तेवढंच फ्युचरिस्टिट आहे, असंही मोदी यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने ६० वर्षांपर्यंत राज्य केलं, पण देशातील अर्ध्या जनतेला मूलभूत सुविधाही देऊ शकले नाही. आम्हाला फक्त १० वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. या दहा वर्षांत मूलभूत सुविधांसोबत जनतेच्या आकांक्षाही पूर्ण केल्या आहेत. गावागावात चांगले रस्ते मूलभूत सुविधा पाहून चांगलं वाटतं की नाही. पुणे मेट्रो पाहा, पुणे विमानतळ पाहा, समृद्धी महामार्ग पाहा, हे आधुनिक भारताचं चित्र आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ही मोदीची गँरेंटी आहे की, तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवास कराल, असं आश्वासन मोदींनी दिलं आहे.
2014 आधी भारत मोबाईल आयात करायचा. मोदी सरकार आल्यानंतर भारत आता मोबाईल निर्यात करतो. मेड इन इंडिया चिपही जगभरात निर्यात केली जाणार आहे. देशाला तरुणी पिढीवर विश्वास आहे. भारताच्या तंत्रज्ञानावर विश्वास आहे. पुण्यातील तरुण बुद्धीमान आहे, येत्या काळात पुणे ऑटोमोबाईल हब बनेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
सातारा : स्त्रीयांची अब्रू घेणाऱ्यांचा सन्मान करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धोरण असून त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही असा पलटवार शरद पवारांनी सातारा येथील सभेत नरेंद्र मोदीवर केला.
“गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना एका भगिनीच्या घरावर हल्ला झाला. अत्याचार केले गेले,त्यांच्या सास-यांची हत्या करण्यात आली. यात दोषींना ११ वर्षांची शिक्षा झाली. मात्र, मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांची सुटका केली आणि गळ्यात हार घालून सन्मान केला. स्त्रीयांची अब्रू घेणा-यांचा सन्मान करण्याचं धोरण जे स्विकारतात ते देशाचे हितचिंतक असू शकत नाही. त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही”, असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. साताराच्या महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी शरद पवार बोलत होते.
या सभेत सत्तेचा गैरवापर कसा करतात याची उदाहरणं त्यांनी दिली. शरद पवार म्हणाले, शशिकांत शिंदे हे कष्ठकरी कुटूंबातले आहेत. आज त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आह. तुमच्या पाठिंब्यावर ते यशस्वी होतील. हे भ्रष्टाचार घालवू म्हणतात, मात्र भ्रष्टाचार घालवायचा ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या कारवाई केली गेली. सत्तेचा गैरवापर कसा करतात याची उदाहरणं त्यांनी दिली. त्यांना धडा शिकवल्या शिवायची ताकत सातारकरांमध्ये आहे, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
इंग्रजांच्या काळात सातारकर घाबरले नाहीत. मात्र,किरकोळ लोकांच्या समोर सुद्धा घाबरणार नाहीत. आपण यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे पाईक आहोत. छत्रपतींच काय बोलायचं? कॉलर उडवायचं म्हणजे आधी सकाळ आहे का? संध्याकाळ आहे? हे बघावं लागतं. त्यांच्या विषयी जास्त बोलण्याचे कारण नाही. आम्ही गादीचा सन्मान करतो,पण मत देताना मत गादीला देत नाही, असंही शरद पवारांनी सांगितलं.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, देशातील शेतकरी वर्ग आज अस्वस्थ आहे. मिळालेली सत्ता ही त्यांच्यासाठी वापरायची असते. १० वर्षापूर्वी मी कृषी खाते सोडलं आणि मोदींचे राज्य आले. या दहा वर्षात त्यांनी शेतीसाठी काय केलं? आज देशातील शेती संकटात आलीये, अनेक प्रश्न निर्माण झालेत. दिल्लीत प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर देशभरातील शेतकऱ्यांनी शेतमालाला किंमती नीट मिळाव्यात यासाठी आंदोलन करायचं ठरवलं. याठिकाणी लोक हजारोंच्या संख्येने आले. यात केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांशी विचारविनिमय करेल अशी अपेक्षा होती. पण त्यांनी ढुंकून बघितलं नाही. पण पंजाबचा शेतकरी हा बहाद्दर होता. ही मंडळी संपूर्ण एक वर्ष याठिकाणी होती. शेवटी सरकारला नाईलाजाने हे धोरण मान्य करावे लागले. सरकारने शब्द दिला, निर्णय घेतले पण त्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे अनेक संकट वाढत आहेत.