एचआयएलद्वारे टॉपलाइनचे २६५ कोटी रुपयांना अधिग्रहण

‘पाईप्स आणि फिटिंग व्यवसायाला गती देणार’

मुंबई : २.९ बिलियन अमेरिकन डॉलर्सची आर्थिक उलाढाल असलेल्या सीके बिर्ला समूहाचा एक भाग एचआयएल लिमिटेडने क्रेस्टिया पॉलिटेकसोबत करार केला आहे, ज्यानुसार एचआयएलने क्रेस्टियाच्या चार पूर्ण मालकीच्या उपकंपन्या टॉपलाइन इंडस्ट्रीज, आदित्य पॉलिटेक्निक, आदित्य इंडस्ट्रीज आणि साईनाथ पॉलिमर्ससोबत पूर्व भारतातील पाईप आणि फिटिंग्सचा एक लोकप्रिय ब्रँड, टॉपलाइन २६५ कोटी रुपयांना अधिग्रहित करण्याचे ठरवले आहे. क्रेस्टिया आणि त्यांच्या उपकंपन्या, टॉपलाइन, रॉकवेल आणि सोनिपलास्ट या तीन आघाडीच्या ब्रँडसह पाईप्स, फिटिंग्ज आणि वॉटर टॅन्क उद्योगात आघाडीवर आहेत. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये त्यांची आर्थिक उलाढाल अंदाजे ३३० कोटी रुपये आहे.
हे अधिग्रहण अंदाजे ५५,००० कोटी रुपयांच्या भारतीय पीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग्जच्या बाजारपेठेत जलद गतीने वाढणाऱ्या पाईप्स आणि फिटिंग व्यवसायाला गती देण्याच्या एचआयएलच्या वचनबद्धतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. उत्पादने, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या पूरक पोर्टफोलिओसह हे एचआयएलला तिची उत्पादन क्षमता लक्षणीयरीत्या वाढवण्यास आणि त्याचा महसूल जवळजवळ दुप्पट करण्यात मदत करेल.
या अधिग्रहणाबाबत अवंती बिर्ला यांनी सांगितले की, “टॉपलाइन संपादनाचा करार आमच्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत असून एचआयएलमधील पाईप्स आणि फिटिंग व्यवसायासाठी आमच्या वाढीच्या धोरणाचा एक भाग आहे. दोन्ही संस्थांच्या एकत्रित समन्वयामुळे उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार होईल. आमच्यासाठी उत्पादन क्षमता आणि बाजारपेठेत वाढ होईल. २०२६ पर्यंत या श्रेणीतील आमच्या सध्याच्या आकाराच्या पाचपट होण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे. हे अधिग्रहण अफाट वाढीची क्षमता प्रदान करते. यामुळे आमचा महसूल केवळ दुप्पट होत नाही तर आमच्या उत्पादन क्षमतेतही तिप्पट वाढ होते, विशेषत: धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या पूर्वेकडील प्रदेशात. याद्वारे आम्ही १५ राज्यांमध्ये टॉपलाइनच्या महत्त्वपूर्ण चॅनेल उपस्थितीत देखील प्रवेश मिळवतो.”
एचआयएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अक्षत सेठ म्हणाले, “टॉपलाइनच्या अद्वितीय क्षमता एचआयएलच्या पोर्टफोलिओला उत्तम प्रकारे पूरक ठरतात आणि आमच्यासाठी नवीन उत्पादन विभाग आणि बाजारपेठा उघडतात. यामुळे महत्त्वाच्या सरकारी प्रकल्पांमध्ये एचआयएलची उपस्थिती आणि १२ राज्यांमधील जल जीवन मिशनला मान्यता देखील वाढते. अलिकडच्या वर्षांत एचआयएलने बिर्ला एचआयएल या ब्रँड नावाने भारतात पाईप्स आणि फिटिंग्ज विभागात मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे.
पेटंट केलेले ट्रूफिट तंत्रज्ञान आणि क्लोरीनेटेड पॉलिव्हिनाईल क्लोराईड, अनप्लास्टिकाइज्ड पॉलिव्हिनाईल क्लोराईड, एसडब्ल्यूआर, भूमिगत ड्रेनेज सिस्टम पाईप रिंग्ज, फोमकोर आणि सायलेंट पाइपिंग सिस्टम्समधील असंख्य उत्पादन नवकल्पनांसह बिर्ला एचआयएल घरगुती, व्यावसायिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील ग्राहकांच्या पसंतीची भागीदार बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *