– बाल आरोग्यासाठी एक प्रभावी पाऊल
कल्याण : डोंबिवली मिडटाउन रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जपत “एग बँक” हा नाविन्यपूर्ण उपक्रम १६ मार्च २०२४ रोजी सुरू केला. रोटेरियन मिलिंद मोहिते यांच्या संकल्पनेतून आणि रोटेरियन प्रदीप बुडबडकर यांच्या “Excellent Year” अध्यक्षीय कार्यकाळात या प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यानंतर हेमंत मुंडके, अनिल हिरावत आणि सध्याचे अध्यक्ष किशोर आढळकर यांनीही या उपक्रमाला मनापासून पाठिंबा दिला आहे.
रोटरीच्या “Maternal and Child Health” या क्षेत्राशी सुसंगत असलेल्या या प्रकल्पाची अंमलबजावणी प्रकल्प अध्यक्ष संतोष शृंगारपुरे व डिंपल शृंगारपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या उपक्रमाद्वारे जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट, डोंबिवली (पूर्व) येथील अनाथाश्रमातील ६ वर्षांपर्यंतच्या सुमारे ४० बालकांच्या प्रोटीनयुक्त आहाराची गरज भागवली जाते. गरजेनुसार १५० अंड्यांचे तुकड्यांमध्ये वितरण केले जाते.
क्लब सदस्य, त्यांचे कुटुंबीय व मित्र यांच्या देणग्यांमधून हा प्रकल्प राबवला जात असून आजपर्यंत ५,००० हून अधिक अंड्यांचे वितरण करण्यात आले आहे. हा उपक्रम रोटरीच्या “Service Above Self” या मूलमंत्राचे जिवंत उदाहरण ठरत असून समाजासाठी समर्पित सेवाभावाची प्रेरणा देत आहे.
०९०००००
