कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील धर्मवीर आनंद दिघे उद्यानात सोमवारी एक झाड पावसामुळे कोसळले असून सुदैवाने त्यावेळी उद्यानात कोणी बाळ गोपाळ मंडळी आणि नागरिक उपस्थित नव्हते. सदर झाड हे लहान मुलांच्या खेळणी बाजूलाच पडले होते. सद्या एमआयडीसी निवासी मध्ये एकामागोमाग झाडे पडत असून प्रशासनाने अशा धोकादायक झाडांचे सर्वेक्षण त्वरीत सुरू करावे अशी मागणी होत आहे. प्रशासनाने, अग्निशमन दलाने पडलेले झाड हे तोडून उद्यानातून घेऊन जावे अशी मागणी नागरिक करीत असून जेणेकरून बाळ गोपाळ मंडळी आणि जॉगिंग ट्रॅक साठी येणाऱ्या नागरिकांना अडचण येणार नाही.
.
