जादा बिलाची चौकशीची मागणी
रमेश औताडे
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे येथे सहा महीने उपोषण करून माहिती अधिकारात माहिती मिळवली असताना मंजुरीपेक्षा सव्वा कोटींचे जादा बिल दिले असल्याची माहिती उघड झाली आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून यातील जबाबदार कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अभियंता यांचेवर कारवाई करावी अशी मागणी भाई आकाश निर्मल यांनी अप्पर मुख्य सचीव सार्वजनिक बांधकाम विभाग व मंत्रालय विभागात केली आहे.
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम ठाणे क्रमांक १ यांनी वाडा मनोर राज्य महामार्ग ३४ या रस्त्यावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी २७ मे २०२२ रोजी २ कोटी ७६ लाख ३४ हजार ४०५ रुपयांचा कार्यारंभ आदेश गंधे यांच्या नावाने आदेश दिला असल्याची माहिती समोर आली आहे. हा आदेश २९ बिलो होता असताना मार्च २०२३ मध्ये याचे अंतीम देयक ३ कोटी ९३ लाख ८८ हजार ५१ रु मंजुर केले. म्हणजे तब्बल १ कोटी १७ लाख ५२ हजार ६४८ रुपये जादा काढले. असा आरोप भाई आकाश निर्मल यांनी माहिती अधिकार कायद्याच्या आधारे घेतलेल्या माहितीतून उघड झाला आहे.
हि जादा रक्कम काढताना क्लॉज ३८ नुसार मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता यांची परवानगी घेतली नसून संदर्भ एम बी नोंद नसल्याने कामाचे चाचणी अहवाल नाहीत. काम सुरु करताना आणि पूर्ण झाल्यावर लेवल रजिस्टर नसल्याची माहिती अधिकारात माहिती दिली आहे असे भाई आकाश निर्मल यांनी सांगितले.
