नवी मुंबई : येथील “मधुर गंधार” या संगीत वर्गाचा तृतीय “वर्धापन दिन” सानपाडा येथील सेक्टर ८ मधील गुडविल युनिटी सभागृहात ४ जुलै रोजी मराठी व हिंदी गीतांच्या मधुर आवाजात मोठ्या उत्साहात संपन्न झाला, अशी माहिती समाजसेवक मारुती विश्वासराव यांनी दिली.
या वर्धापन दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गायक, गीतकार, संगीतकार आणि “आई तुझ देऊळ” फेम, योगेश अग्रावकर अलिबागवरून तर सरगम संगीत अकादमीचे गायक, संचालक नरेश पाटील हे पनवेलवरून मुसळधार पाऊस असतानाही उपस्थित होते. नवी मुंबईत सानपाडा येथे अमृता भेरे या मधुर गंधार या संस्थेच्या वतीने संगीत वर्ग चालवतात. या वर्धापन दिन सोहळ्याला नाट्यकलाकार आणि चित्रपट अभिनेते राम काजरोलकर, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव, सचिव जगदीश एकावडे, खजिनदार महादेव पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे, मंगला मानधने, चंद्रकांत पारपिल्लेवार, नारायण साखरे, श्रीमती हेबाळकर, ज्येष्ठ नागरिक सभासद तसेच नवी मुंबईतून विशेष निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
मधुर गंधार या संगीत वर्गाची स्थापना १ जुलै २०२३ रोजी, वर्गाच्या संचालिका अमृता भेरे यांनी सचिन तेली आणि शिवप्रसाद निकम यांच्या सहकार्याने नवी मुंबईत सानपाडा येथे केली. संगीत वर्गामध्ये गायक- गायिका यांना कराओकेसाठी जो लिरिक्स ट्रॅक असतो, तो न बघता गाणं गात होते, समोर कोणतीही कराओके स्क्रीन नसताना अगदी तालासुरात गात होते, कारण त्यांना अशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं, हिच या वर्गाची खरी खासियत आहे. यामुळे मधुर गंधार हा इतर कराओके क्लासेसपेक्षा वेगळा क्लास वाटतो.
मधुर गंधार सानपाडा, नवी मुंबईत सुरु असलेला हा कराओके वर्ग, आठवड्यातून दोन दिवस असतो. या वर्गात अठरा ते ज्येष्ठ नागरिक या वयोगटातील संगीतप्रेमी आवडीने शिकायला येतात, यामध्ये गृहिणी, छोटे मोठे गृहउद्योग करणारे आणि सेवानिवृत्त नागरिक तसेच मोठमोठ्या हुद्यावर कार्यरत असणारे शिक्षक, अभियंता, डॉक्टर, पोलीस सहआयुक्त, वकील, सरकारी अधिकारी, योगा प्रशिक्षक, अकाऊन्टट आणि नाट्य-सिने अभिनेते, हेसुद्धा आपली गाण्याची आवड जोपसतात. वर्धापन दिन सोहळ्याला महिलांची विशेष उपस्थिती होती.
00000000
