श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित हॉटेल मंगलम, नरसोबा वाडी, कोल्हापूर येथे कै अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या १० व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटातील तिसऱ्या फेरीच्या सामन्यात १४ वर्षाच्या कोल्हापूरच्या ओंकार वडरने प्रेक्षकांची मने जिंकली खरी परंतु पुण्याच्या रविंद्र हांगे विरुद्ध त्याला तीन सेटच्या कडव्या झुंजीनंतर १४-१२, १४-२५ व १४-१५ अशी हार पत्करावी लागली. सातव्या बोर्डात ओंकारकडे १४-१० अशी आघाडी होती. परंतु शेवटचा ब्रेकचा फायदा उठवत रविंद्र हांगेने बाजी मारली. स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह व स्पर्धा प्रमुख हर्षद पुजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी श्री दत्तराज संस्थानाचे अध्यक्ष गुंडो श्रीपाद पुजारी, सरपंच चेतन चंद्रकांत गवळी व माजी सरपंच अमोल विभुते, तसेच राज्य कॅरम असोसिशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर व सचिव अरुण केदार उपस्थित होते.
पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल पुढील प्रमाणे.
रविंद्र हांगे ( पुणे ) वि वि ओंकार वडर ( कोल्हापूर ) १२-१४,२४-१५, १५-१४
मनोज कांबळे ( ठाणे ) वि वि अख्तर शेख ( कोल्हापूर ) २५-०, २५-२
भरत कोळी ( मुंबई ) वि वि अनंत भुते ( पुणे ) १८-१७, २५-५
शैलेश सोळंकी ( मुंबई ) वि वि संजय मोहिते ( मुंबई ) २०-१३, ०-२५, २३-८
रियाझ अकबर अली ( रत्नागिरी ) वि वि सुजित कुमार उके ( पुणे ) २५-११, २५-९
रोहित चौगुले ( कोल्हापूर ) वि वि योगेश कदम ( ठाणे ) २१-६, १९-६
महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि सुधाकर नाईकरे ( पुणे ) २५-०, २५-८
वासिम शेख ( पुणे ) वि वि धर्मराज रक्षे ( मुंबई ) २३-१८, २५-१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *