रमेश औताडे
मुंबई : रमाबाई नगर पोलीस गोळीबार भीम सैनिक स्मृती दिनानिमित्त घाटकोपर येथे अभिवादन सभा तसेच त्या शहिद भीम सैनिकांचे आर्थिक पुनर्वसन, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी, भीम सैनिकांवर बेछूट गोळीबार करणारे पोलिस अधिकारी मनोहर कदम यांना राजनैतिक संरक्षण, आदी विषयावर समिक्षा परिषद होत आहे असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले.
शहिद भीम सैनिक भवन येथे ११ जुलै रोजी होणाऱ्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, प्रमुख वक्ते दलित पँथरचे नेते भाई मुजिब पठाण, सुप्रसिद्ध विचारवंत उत्तमराव गायकवाड, मुंबई प्रदेश अध्यक्ष विकास काटे, महिला नेत्या आरती भोईर, संगिता जैस्वाल, रत्ना पाटोळे, जयदेव चिंवडे हे राहणार आहेत. असे विकास काटे यांनी सांगितले.
पोलिस अधिकारी मनोहर कदम अद्याप मोकाट आहेत. शहीद भीमसैनिक आर्थिक पुनर्वसन नसल्याने त्यांच्या कुटुंबाचे हाल आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी नसल्याने अन्याय होत आहे. त्यामुळे सरकारने गंभीरपणे निर्णय घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले आहे.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *