छत्तीसगढ : छत्तीसगडमधिल अबुझमाड मध्ये सुरक्षा दलानी दहा माओवाद्यांचा चकमकीत खात्मा केला आहे. मृतांच्या संखेत आणखी वाढ होण्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांकडून व्यक्त करण्यात आलीय. या चकमकीत घटनास्थळी ३ महिलांसह एकूण १० माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. तर, चकमकीच्या ठिकाणाहून एक एके-४७ सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे, असे देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नक्षलावादी कारवायांच्या तयारीत असलेल्या नक्षल्यांच्या तुकडीवर सुरक्षा दलाच्या जवानांनी अचानक हल्ला केला. यामुळे त्यांचा डाव उधळून लावण्यात जवानांना यश आले आहे.
या चकमकीत नक्षलवाद्यांचे सीसी सदस्य आणि डीव्हीसी सदस्य ठार झाल्याची माहितीही हाती आली आहे. तर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्फोटके, राशन, कॉम्प्युटर, औषधीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना या शोध मोहिमेत जंगलात लपवलेली एक जेसीबी मशीन देखील आढळून आली आहे. या जेसीबीचा उपयोग जमीन खोदून बंकर बनविण्यासाठी नक्षलवादी वापर करत असतात.