पत्रकार प्रकाश जाधव यांच्या संघर्षाला यश
राजीव चंदने
मुरबाड : मधील सार्वजनिक बांधकाम विभाग 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व 1 में रोजी आपल्या कार्यालयात ध्वजारोहण करत नसल्याबाबत विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला गेला. असं असूनही ही संबंधित अधिकारी ध्वजारोहण करण्यात उदासीनता दाखवत असल्याने पत्रकार प्रकाश जाधव यांनी राज्याचे मुख्य सचिव, मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता , कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन एक मे रोजी जिल्हाधिकारी ठाणे यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी एक मे रोजी आपल्या कार्यालयासमोर ध्वजारोहण केल्याने पत्रकार प्रकाश जाधव यांचे संघर्षाला यश आले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिपत्याखाली असलेल्या शिवनेरी या शासकीय विश्रामगृहासमोर सुमारे 125 फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्यासाठी मार्च 2023मध्ये प्रशासकीय मान्यता व दहा लाखांची तरतूद असताना उप अभियंता कैलास पंतिगराव यांनी केवळ चाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारुन तीस ते चाळीस हजार रुपये खर्च केले आणि काम सप्टेंबर 2022 मध्ये पुर्ण करुन त्यावर दहा लाख रक्कम खर्च झाल्याची पाटी लावली.व 26 जानेवारी 2023 रोजी येथे ध्वजारोहण केले. या अनियमितते बाबत विधानसभा सदस्या यामिनी जाधव यांनी लक्षवेधी उपस्थित केली.त्या नंतर अधिकाऱ्यांनी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात उदासीनता दाखविली असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या असता पावसाळी अधिवेशनात याबाबत विधीमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात येऊन संबंधित उपविभागाकडुन खुलासा मागविण्यात आला.परंतु या उप अभियंत्याने आपल्या वरिष्ठांची व विधीमंडळ सभागृहाची दिशाभूल करणारा अहवाल सादर केला.परंतु मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय ध्वजस्तंभात अनियमितता करुन कार्यालयात ध्वजारोहण करण्यात उदासीनता दाखविली असल्याचे पुरावे विधी मंडळ ,राज्याचे मुख्य सचिव, मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता कार्यकारी अभियंता, यांना सादर करुन एक मे रोजी जिल्हाधिकारी ठाणे येथे आमरण उपोषणाचा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांच्या चौकशीला वेग आला आणि त्यांनी आपल्या कार्यालयात एक मे रोजी ध्वजारोहण करुन आपण ध्वजारोहण करण्यात टाळाटाळ केली आहे असे सिद्ध करुन दिले असल्याने या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.