मिरा-भाईंदर : माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या वाढदिवसानिमित्त उमराव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चतर्फे निःशुल्क आरोग्य, नेत्र व कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वतीने ४० दिव्यांग बांधवांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आरोग्य तपासणी, प्राथमिक निदान आणि तज्ज्ञांचे वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, हा शिबिराचा उद्देश होता. यासाठी वोखार्ड हॉस्पिटल, इंडिअन कॅन्सर तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे मेडिकल ऑफिसर डॉ. नंदकुमार लहाने यांचे सहकार्य लाभले. शिबिरात कर्करोग प्रतिबंध व प्राथमिक तपासणीबाबत जनजागृती करण्यात आली.
दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनातील हालचाली सुलभ व्हाव्यात आणि त्यांचे स्वावलंबन वाढावे, या उद्देशाने व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी आमदार मुझफ्फर हुसैन म्हणाले, “जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन गरजेच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी लोकसेवा आहे. वाढदिवसानिमित्त गरजूंसाठी काहीतरी करता येणे, हा माझ्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा विषय आहे.”
0000
