डॉ. भरत बास्टेवाड व पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली
दीड लाख विद्यार्थांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
अशोक गायकवाड
अलिबाग : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. समग्र शिक्षा अभियानातंर्गत रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ८४ हजार १६२ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
समग्र शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणार्या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार १६२ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या बालभारती विभागाकडे केली आहे. मागणी केलेली पुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाल्यानंतर, ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकार्यांकडे देण्यात येतील. तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे.
चौकट
मोफत पाठ्यपुस्तक देण्यात येणारे जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत सर्वात जास्त ४९ हजार ९३३ विद्यार्थी पनवेल तालुक्यात असून, अलिबाग १३ हजार २२, पेण १५ हजार ३२५, उरण ९ हजार ५९८, कर्जत २० हजार ३५७, खालापूर १५ हजार ३३८, सुधागड ७ हजार ३०३, रोहा १० हजार ६१३, माणगाव ११ हजार ७६५, महाड ११ हजार २२९, पोलादपूर २ हजार ६४०, म्हसळा ४ हजार २६, श्रीवर्धन ५ हजार ७४९, मुरुड ४ हजार ७२८, तळा २ हजार ५३६ विद्यार्थी आहेत.