दुबईतील आंतरराष्ट्रीय बुडोकन कराटे स्पर्धेत
ठाणे – ठाण्यातील सेंट जॉन बाप्टीस्ट स्कुलमध्ये शिकत असलेला आर्यन मनोज कनोजिया हा कराटेपटू आंतरराष्ट्रीय बुडोकन कराटे स्पर्धेत देशाचं नेतृत्व करताना सुवर्णपदक विजेता ठरला आहे. त्याच्या यशाबद्दल देशभरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दुबई येथे आयोजित दुबई बडोकन कप 2024 आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत जगभरातील 16 देशांमधून 828 स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये युएई, जपान, कुवैत, साउदी अरब, कजाकिस्तान, चीन, जपान, नेपाळ, पाकिस्तान, ओमान, फिलीपाईन, इंडोनेशिया, भुतान, युके आणि ऑस्ट्रेलियातील स्पर्धक सहभागी झाले होते. यात भाग घेणारा ठाणे शहरातील चंदनवाडी विभागात राहणारा आणि सेंट जॉन स्कुलमध्ये चौथी इयत्तेत शिकणारा विद्याथी आर्यन मनोज कनोजियाने त्याचे प्रशिक्षक फ्राझ सर यांच्या प्रशिक्षणात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याच्या यशाबद्दल ठाणे शहरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.