महाजनांनी पुन्हा खडसेंना डिवचले

नगर : मनाने भाजपात पुन्हा दाखल झालेल्या एकनाथ खडसेंना त्यांचे राजकीय विरोधक भाजपाच्याच गिरीष महाजन यांनी पुन्हा एकदा डिवचले आहे. खडेसे यांनी एन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अजून त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाही. त्यातच एकनाथ खडसे यांनी त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचा प्रचार रावेर लोकसभा मतदारसंघात सुरु केला आहे. यावरून मंत्री गिरीश यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. खडसे यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतर त्यांनी भाजपचे काम करावे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतोय. कधी म्हणतात मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपचा आहे.

विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची आहे. घरात सगळेच पक्ष ठेवायचे, असे त्यांचे सुरु आहे. त्यांनी आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळ्यांचे काम करायचे. लोकांना असे राजकारण आवडत नाही, त्यामुळे त्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे, अशी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे.

महायुती जागावाटपाबाबत विचाले असता गिरीश महाजन म्हणाले की, महायुतीचे जागा वाटप पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यासाठी उशीर झाला आहे. मात्र नाशिक, ठाणे या सर्व जागा महायुतीच जिंकणार आहे. मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचंय हे लोकांनी ठरवलंय, असे त्यांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *