आता ७ मेला सर्वोच्च सुनावणी

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अशीच सुरु राहीली तर सध्या सुरु असलेल्या लोकसभेच्या पार्श्वभुमीवर त्यांना अंतरीम जामीन मंजुर करता येऊ शकतो असे सुचक निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने आज नोंदविले आहे. न्यायाधीश दीपांकर दत्ता, आणि न्यायाधीश संजीव खन्ना यांचं खंडपीठ केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर निर्णय देऊ शकतं. जामीन अर्जावर आता ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.

मंगळवारी ७ मेला सकाळी १०.३० ला सुनावणीला सुरुवात होईल. सध्या देशात लोकसभेसाठी निवडणूका सुरु आहेत. अशावेळी लोकसभा निवडणूकीत भाग घेण्याचा, आपल्या पक्षाचा प्रचार करण्याचा केजरीवाल यांचा नैसर्गिक हक्क त्यांच्याकडून हीरावून घेतला जात आहे असे केजरीवाल यांचे वकील ए.एम. सिंघवी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. सिंघवी यांनी चतुरपणे ईडीच्या अटकेववर त्यांच्या पीएमएएल कायद्याच्याविरोधात अपील न करता अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या प्रक्रीयेवर आणि टायमिंगवर अपील केले असल्यामुळे कोर्टात ईडी बॅकफुटवर गेली आहे. आणि म्हणूनच कोर्टानेही सुनावणी लांबणार असेल तर आम्ही अंतरिम जामिनावर विचार करु असे म्हटले आहे.

आजच्या सुनावणीत केजरीवालांनी मुख्यमंत्री म्हणून कोर्टातून फाईल हाताळण्यावरही ईडीने आक्षेप घेतला. यावरही कोर्ट काय् निरिक्षण नोंदविते याकडे आम आदमी पार्टीचे लक्ष लागलेले असेल.

दिल्लीतील कथित मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली. ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास आणि कोणतेही संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. केजरीवाल हे अटक झालेले आजवरचे पहिले मुख्यमंत्री आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षातील ते तिसरे ज्येष्ठ नेते आहेत. यापूर्वी आपचे खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनादेखील मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *