माथेरान : गर्मीचा कहर सुरू झाल्यानंतर पिण्याचा पाण्याचा तुटवडा ही सुरू झाला आहे मनुष्य प्राणी काहींना काही करून स्वतःच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत असतो परंतु जंगलामध्ये राहणारे वन्य प्राण्यांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागते व त्यामध्येच काही टपून बसलेल्या विघ्न घातकी लोकांकडून त्यांची शिकार केली जाते त्यामुळेच या दिवसांमध्ये वन्य प्राण्यांसाठी ठिकठिकाणी पानवटे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.

मागील काही वर्षांमध्ये माथेरानमध्ये वन्य प्राण्यांची संख्या वाढलेली दिसून येत असते ज्यामध्ये प्रामुख्याने भेकर, शेकरू रानडुक्कर त्याचप्रमाणे बिबट्याही आढळून आला आहे या व्यतिरिक्त अनेक पशुपक्षी या दिवसांमध्ये माथेरानमध्ये येत असतात परंतु त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अगदी नगण्य आहे माथेरान मध्ये अनेक जिवंत झरे आहे परंतु त्यांची निगा न राखल्या गेल्यामुळे हे पानवठे मे महिन्यापर्यंत सुखत असतात त्यामुळेच या वन्य प्राण्यांना अनेक वेळा पाहण्यासाठी मानव वस्तीमध्ये प्रवेश करावा लागत असतो व त्यातच त्यांचा जीव ही गेलेला आहे अशा घटना दरवर्षी माथेरान मध्ये घडतच असतात यामध्ये हरण जातीच्या भेकर हा प्राणी रानटी कुत्रे यांचा बळी ठरतो तर सध्या माथेरानमध्ये बिबट्याचे दर्शन स्थानिक नागरिकांना होत आहे व हा बिबट्या माथेरान मधील सिमसंन टॅंक या तलावाच्या परिसरामध्येच प्रामुख्याने आढळून आलेला आहे त्यामुळेच माथेरान मधून नागरिकांमध्ये या परिसरात वावरताना दहशतीचे वातावरण आहे.

या काळामध्ये माथेरान मध्ये अनेक स्थलांतरित पक्षी व प्राणी येत असतात हा त्यांचा प्रजननाचा काळ असल्याने जंगल परिसरामध्ये पक्षांचा किलबिल ऐकू येत असतो म्हणूनच अशा पक्षांनाही पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे ज्याने माथेरानचे नैसर्गिक सौंदर्य अबाधीत राहील व हे पक्षी वर्ष येत असल्याने त्यांची सोय होणे गरजेचे आहे.

काही वर्षांपूर्वी वन विभागाकडून पाणी आडवा पाणी जिरवा या अंतर्गत जंगलांमध्ये बंधारे बांधण्यात आले होते व त्यामध्ये आणि साठा गर्मीमध्येही आढळून येत असेल परंतु आता हे सर्व जमीन दोस्त झाल्यामुळे नव्याने जंगलामध्ये पाणवठे निर्माण करण्याची गरज असून वन विभागाने त्याकडे लक्ष द्यावे असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *