ठाणे  : तन्वी चव्हाणच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्पोर्टींग क्लब कमिटीने क्वोरा क्रिकेट क्लबचा १५१ धावांनी दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटना आयोजित महिलांच्या डॉ कांगा बाद पद्धत क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. स्पोर्टींग क्रिकेट क्लबने दिलेल्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तन्वी अचूक माऱ्यासमोर क्वोरा क्रिकेट क्लबचा डाव अवघ्या ४९ धावांवर आटोपला.

प्रथम फलंदाजी करताना स्पोर्टींग क्लब कमिटी संघाने ३३.२ षटकात ९ फलंदाजांच्या मोबदल्यात २०० धावा केल्या. संघाला द्विशतकी धावसंख्या उभारून देताना प्रतीक्षा पवारने ३५,ध्रुवी  पोळने ३१  , वैष्णवी पालवने ३० आणि प्रांजल माळेकरने २४ धावा केल्या. श्रावणी पाटील आणि कर्णिका  बावकरने प्रत्येकी  दोन फलंदाज बाद केले . या आव्हानाचा  पाठलाग करताना तन्वीच्या गोलंदाजीसमोर क्वोरा क्रिकेट क्लबच्या एकही  फलंदाज खेळपट्टीवर फार काळ तग धरू शकला नाही. तन्वीने ४ षटकात  एका निर्धाव षटकासह ५ गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : स्पोर्टींग क्रिकेट क्लब : ३३.२ षटकात ९ बाद २०० ( प्रतीक्षा पवार ३५, वैष्णवी पालव ३०, ध्रुवी पोळ ३१, प्रांजल मळेकर २४, श्रावणी पाटील ७-४८-२, कर्णिका बावकर ६-४६-२) विजयी विरुद्ध क्वोरा क्रिकेट क्लब : १६ षटकात ८ बाद ४९ ( किंजल कुमारी १७, तन्वी चव्हाण ४-१-१०-५,आर्य कानडे ४-१९-१, अबीगला नाईक ४-२-१०-१).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *