सिंधुदुर्ग : सामंत बंधूमधिल नाराजी नाट्य आज मतदानाच्या दिवशी पुन्हा एकदा दिसून आले. राणेंच्या एवेजी या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उत्सुक होते. पण एनवेळी शिवसेनेची ही तिकीट भाजपाने हिसकावून घेत तेथे नारायण राणे यांना तिकीट दिली. त्यामुळे आज मतदानाच्या निर्णायक दिवशी नॉट रीचेबल असणारे किरण सामंत अखेर मतदान संपण्यास अवघी १५ मिनिटे शिल्लक असताना अवतरले आणि त्यांनी रत्नागिरीत मतदानाचा हक्क बजावला.
किरण सामंत यांनी पाली या त्यांच्या मूळगावी मतदानाचा हक्क बजावला. किरण सामंत हे सकाळपासून नॉट रीचेबल होते, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. आपल्या सीम कार्डच्या प्रॉब्लेममुळे आपण नॉट रीचेबल होतो, पण आपले ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याची प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली. ऐन मतदानाच्या दिवशीच किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये चिंतेच वातावरण होते. मतदारांपर्यंतही त्याचा चुकीचा मेसेज जातो असे राणे गटाकडून शिनवसेनेला सांगण्यात आले. आणि त्यानंतर सुत्रे हलली आणि किरण सामंत अखेर मतदानाला उपस्थित राहीले. पण दिवसभर किरण सामंत गायब असल्याचा नारायण राणे यांना किती फटका बसतो हे आता ४ जूनलाच कळेल.