रत्नागिरी : किरण सामंत हे आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर आल्या आहेत. कोकणात झालेल्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दहशतवादी प्रवृत्तीने कायम डोके वर काढले आहे. ही दहशतवादी प्रवृत्ती आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना समोर पराभव दिसू लागल्याने त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे किरण सामंत यांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे. अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.