अध्यक्षपदी  एस. के. शेट्ये, कार्याध्यक्षपदी डॉ. यतीन पटेल, जनरल सेक्रेटरीपदी सुधाकर अपराज यांची निवड

अनिल ठाणेकर

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी  एस. के. शेट्ये, कार्याध्यक्षपदी डॉ. यतीन पटेल, जनरल सेक्रेटरीपदी सुधाकर अपराज यांची निवड करण्यात आली.

भारतातील प्रमुख बंदर व  मुंबई बंदरातील सर्वात जुनी १०४ वर्षे कार्यरत असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉइज युनियनच्या २५ एप्रिलला माझगाव येथील कामगार सदन सभागृहात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष, कार्याध्यक्ष व जनरल सेक्रेटरी पदासाठी बिनविरोध निवड झाली होती. सभागृहाने ठराव करून अध्यक्ष, कार्याध्यक्ष व जनरल सेक्रेटरी यांना उर्वरित पदांसाठी कार्यकारिणी निवडीचेअधिकार दिले होते. त्याप्रमाणे  ६ मे ला   २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी निवडलेली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणी :  अध्यक्षपदी – एस. के. शेट्ये, कार्याध्यक्षपदी – डॉ. यतीन पटेल, जनरल सेक्रेटरीपदी – सुधाकर अपराज, उपाध्यक्षपदी –  अहमदअली काझी, शीला भगत, विष्णू पोळ, प्रदीप नलावडे, रमेश कुऱ्हाडे, सेक्रेटरीपदी – विद्याधर राणे, दत्तात्रय खेसे, विजय रणदिवे, मनीष पाटील, खजिनदारपदी – विकास नलावडे, प्रसिद्धीप्रमुख –  मारुती विश्वासराव, संघटक सचिवपदी – मिर निसार युनूस, संदीप चेरफळे, प्रवीण काळे, संतोष कदम, अनंत भोसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *