मुंबई : भाद्रपद शुद्ध चतुर्थी, गणेश चतुर्थीला, श्री गणेश पूजन कसे करावे ह्याचे प्रशिक्षण आणि पूर्वी शिकलेल्यांसाठी उजळणी वर्ग १२ मे २०२४ पासून, दर वर्षी प्रमाणे, दर रविवारी सकाळी ९ ते ११ वाजे पर्यंत, वनमाळी हॉल , छबिलदास रोड, दादर पश्चिम, मुंबई ४०००२८ येथे होतील. सदर वर्ग नि:शुल्क आहेत आणि सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, लिंग, वय असे कसलेही भेद पाळत नाही. सर्वास खुले आहेत. प्रत्येकास १२ मे पासून श्रावण महिना संपे पर्यंत दर रविवारी हजर राहायचे आहे. नोंदणी आवश्यक नाही. ईच्छुकांनी थेट वनमाळी हॉल येथे वही आणि पेन घेऊन हजर रहावे. काही शंका असल्यास, प्रमोद नाईक —, ९९२००६६५७५