ठाणे  : दिवा प्रभाग क्षेत्रात शीळ, खर्डी आणि भोलेनाथ नगर तसेच, मुंब्रा प्रभाग क्षेत्रातील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्निशमन केंद्रापर्यंतच्या भागात गुरूवार, ९ मे रोजी  सकाळी १० ते सायंकाळी ६ या आठ तासात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवर भोलेनाथ नगर गेट समोरील नाल्यातील ६६० मीमी व्यासाच्या जलवाहिनीवरील अनधिकृत नळ संयोजन खंडित करणे आणि कल्याण फाटा जलकुंभाकडे जाणाऱ्या जलवाहिनीवरील ३५० मी मी व्यासाच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करणे या कामांसाठी गुरूवार, ०९ मे रोजी  स. १० ते सायं. ६ या आठ तासात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण फाटा येथून एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून होणारा पाणी पुरवठा या काळात खंडित राहणार आहे.

दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पुढील दोन दिवस या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणी साठा करून ठेवावा, तसेच, पाण्याचा अपव्यय टाळून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *