अमेरिकेच्या बफेलो विद्यापीठात ऑनर्स स्टुडेंट कॉन्सीलच्या अध्यक्षपदी

मुंबई (प्रतिनिधी):- लातुरचे माजी खा. अ‍ॅड. सुनिल गायकवाड यांची पुतणी रिया विजयकुमार गायकवाड हिची अमेरिकेच्या बॅफेलो विद्यापीठाच्या ‘ऑनर्स स्टुडेंट’ कौन्सीलच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी तिची अध्यक्षपदी निवड झाली आहे. रिया ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (बायोमेडिकल इंजिनिअरिंग) प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. सातसमुद्रापार तिने हे यश मिळविल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मा.खा. सुनिल गायकवाड, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिलकुमारजी बी. गायकवाड, विक्रांद टाइम्स व अग्रसेन टाइम्स परिवार, मुख्य संपादक अरुणकुमार एस. मुंदडा, लेखक मिलिंद काटे, ज्येष्ठ पत्रकार गुलाब भावसार, भागा वरखडे, राजीव मंडलिक, अण्णा सोमवंशी, चांद शेख, निलेश वाणी आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या या यशाने गायकवाड कुटुंबीयाच्या मानात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *