ठाणे महापालिकेतर्फे शुक्रवारी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी पुष्पहार वाहून अभिवादन केले. त्याप्रसंगी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व ठाणेकर नागरिक उपस्थित होते.