मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आता चौथ्या टप्प्यात प्रचाराचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार सभा सुरू आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई मतदारसंघातून यामिनी जाधव निवडणूक लढवत आहे. आजही त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये विराट अशी रॅली काढली होती.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे उमेदवार यामिनी जाधव दक्षिण मुंबईमधून निवडणूक लढवत आहे. यामिनी जाधव यांनी आज गुरुवारी भायखळा परिसरात रोड शो केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा , मनसे , रिपाई नेते आणि सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहे.
