पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र  दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी सनातन संस्थेशी जवळीक असणाऱ्या

सचिन प्रकाशराव अंदूरे आणि शरद भाऊसाहेब कळसकर यांना दोषी ठरवून त्यांना जनमठेप आणि पाच लाख दंडांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. तर सनातनचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि सनातनचे वकील असणाऱ्या  संजीव पुनाळेकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान निर्दोष सुटेलेल्या या तीघांविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे दाभोळकर यांची कन्या मुक्ता दाभोळक यांनी सांगितले आहे. सनातन संस्थेने याआधीच अंदुरे आणि कळसकर यांच्याशी संस्थेचा कोणताही संबध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालय म्हणाले, “साक्षीदाराची उलट तपासणी घेताना आरोपीच्या वकिलांकडून खुनाचा समर्थन करण्याची वक्तव्य करण्यात आली ती दुर्देवी आहेत. त्यावर त्यांनी विचार करावा असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच या खुनागील मास्टर माईंड अजुनही मोकाट आहे. त्याचा शोध तपास यंत्रणांनी घेतला पाहिजे असेही न्यायालयाने म्हटले आहे.”

डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या घटनेने अवघे राज्य हादरले. दाभोलकरांच्या खुनानंतर तब्बल आठ वर्षांनी हा खून खटला सुरू झाला. खुनाचा तपास पूर्ण होऊन पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला चालू होता. सुरुवातीच्या काळात पुणे पोलिस या खुनाचा तपास करीत होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. १५ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम ३०२ (हत्या), १२० (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), ३४ नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

सीबीआयने 26 मे 2019 मध्ये मुंबईतील सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रम भावे या दोघांना अटक केली होती. दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकरने गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल नष्ट करण्यासाठी पुनाळेकर यांनी सल्ला दिला. त्यानुसार कळसकरनं चार पिस्तुल ठाण्याच्या खाडीत फेकून दिल्या, तर विक्रम भावेनं शूटर्ससाठी परिसराची रेकी केली, असे आरोप सीबीआयने केले होते.

सीबीआय कोठडीतील चौकशीनंतर 5 जुलै 2019 ला संजीव पुनाळेकर यांची जामिनावर सुटका झाली होती. ठाण्याच्या खाडीत फेकलेल्या पिस्तुलासाठी विदेशी एजन्सीच्या मदतीनं सीबीआयनं शोधमोहिम राबवली होती. यासाठी तब्बल साडेसात कोटी रुपये खर्च आला होता.

अखेर 5 मार्च 2020 ला हे पिस्तुल सापडल्याचा दावा सीबीआयनं केला होता

दरम्यान, सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती. त्यानंतर नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी २ साक्षीदार न्यायालयात उभे केले. आता या खटल्याचे कामकाज पूर्ण झाले असून, आज दाभोलकर खटल्याचा निकाल लागला.

 खुनी क्रमांक १

शरद कळसकर

शरद कळसकर हा छत्रपती संभाजीनगरमधील रहाणारा आहे. ससकेसापूर येथील तो रहिवाशी आहे. छत्रपती संभाजीनगरमधील विवेकानंद महाविद्यालयात त्यानं बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर शिक्षणाला रामराम ठोकला. त्यानंतर तो कोल्हापूरला काम करणार असल्याचे सांगून त्याने घर सोडलं होतं. सनातन संस्थेशी त्याची जवळकी होती. त्याच्या वडिलांकडे सहा एकर शेती आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याची कबुली शरदने यापूर्वीच दिली आहे.

खुनी क्रमांक २

सचिन अंदुरे

सचिन हा शरद कळसकरचा हा जवळचा मित्र आहे. तो नालासोपारा स्फोटक प्रकरणात कळसकर सोबत होता. सचिनचे आई-वडिल हयात नाहीत. त्याला अटक झाली त्यावेळी तो छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होता. येथील राजाबाजार कुवारफल्ली येथे एका भाड्याच्या घरात त्याचे बिऱ्हाड होते. पत्नी आणि एका मुलीसह तो राहत होता. निराला बाजारातील एका कपड्याच्या दुकानात तो काम करत होता. एटीएसने त्याला अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *