नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजुर केलाय. लोकसभा निवडणूकीत प्रचार करण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेता येणार नाहीत या निकषावर अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीच्या कथित मद्यधोरण प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हा जामीन १ जूनपर्यंत असेल. एन लकोसभा निवडणूकीच्या धामधुमित केजरीवलांना अटक केल्याने आधीच त्यांना सहानुभूती मिळत होती. आता प्रचारासाठी जामीन मिळाल्यामुळे भाजपाच्या अडचणीत वाढ होणार आहे.
पंजाबमध्ये २५ मे तर दिल्लीत १ जूनला मतदान पार पडणार आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा असून नवी दिल्लीत ७ जागा आहेत. पैकी दिल्लीतील ७ पैकी ७ तर पंजाबमध्ये ५ जागा भाजपाने २०१९ साली जिंकल्या होत्या. या १२ जागा ठिकवण्याचे आव्हान भाजपापुढे असेल.
अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी ४ जूनपर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली होती. मात्र, प्रचार ४८ तास अगोदर संपतो, असं सांगत न्यायालयाकडून केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला. अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान या खटल्यावर काहीही बोलू शकत नाहीत, अशी अटही त्यांना घालण्यात आली आहे. दरम्यान,
तिहार जेलमधून सुटका होताच वाजत गाजत आपच्या हजारो कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे स्वागत केले. मैने कहा था मै जल्दही आऊंगा असे म्हणत हुकुमशाही विरोधात देशातील १४० कोटीम जनतेने पुढाकार घ्यावा असे समर्थकांना संबोधिक करीत असताना ते म्हणाले. नवी दिल्लीतील प्रसिध्द हनुमान मंदिरात उद्या सकाळी ११ वाजता दर्शन घेऊन ते प्रचाराला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर दुपारी पार्टी मुख्यालयात पत्रकार परिषद आणि त्यानंतर रोडशो आयोजित करण्यात आल्याचे पार्टीकडून सांगण्यात आले.
ईडीनं अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या घरी छापा टाकला होता. काही तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना अटक केली होती. त्यावेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आक्रमक निदर्शने केली होती. मध्यंतरीच्या काळात केजरीवाल यांनी जामिनासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना यश मिळाले नव्हते. केजरीवाल यांना जामीन दिल्यास चुकीचा संदेश जाईल, असं ईडीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होते. मात्र, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठानं युक्तिवाद ऐकल्यानंतर केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे.
