नंदुरबार : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभे नंतर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे म्हटले होते. हाच धागा पकडत काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपाप्रणीत एनडीएत यावे त्यांचे स्वागत होईल अशी खुली ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

 मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अजित पवार आणि एकनाथ शिंदेसोबत येण्याची ऑफर दिली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलं आहे. याआधी देखील एका मुलाखतीमध्ये मोदींनी उद्धव ठाकरे अडचणीत असतील तर मदतीसाठी जाणारी पहिली व्यक्ती मी असेन असं म्हटलं होतं.

“महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते ४० वर्षांपासून फिरत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते खूप चिंतेत आहेत. त्यांनी एक विधान केलं आहे जे मला वाटतं त्यांनी अनेकांसोबत चर्चा करुन केलं असेल. ते इतके हताश आणि निराश झालेत की त्यांना वाटतंय ४ जूनच्या नंतर राजकारणात टिकून राहायचं असेल तर छोट्या राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हायला हवं. याचा अर्थ असा की जी नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत या. मोठ्या अभिमानाने स्वप्ने साकार होतील,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *