मुंबई : आपल्याला भारताबाहेरून राहील नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सांगत अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शरद पवार आणि दाऊद इब्राहिम कासकर यांच्याबद्दल माध्यमासमोर वक्तव्य केल्यानंतर हा धमकीचा फोन आल्याचा दावा सदावर्तेंनी केला.
राहील नामक व्यक्तीने भारताच्या बाहेरून धमकीचा फोन केल्याची माहिती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. या संदर्भात गृहविभागाने देखील दखल घेऊन दहशतवाद विरोधी पथकाकडे याचा तपास द्यावा अशी मागणी सदावर्तेंनी केला.
दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्यानं मोठा दणका दिला असून एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदावरून दोघांचीही गच्छंती करण्यात आली आहे.
