सध्या देशात पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून २०२४ रोजी लागणार असून त्यानंतर सामान्य माणसाला फटका बसण्याची शक्यता आहे. निकालानंतर मोबाईलचे रिचार्ज महागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनमध्ये वाढ केलेली नाही; मात्र निवडणूक संपताच मोबाईलच्या डेटा पॅकमध्ये २० ते २५ टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘बीओएफए सेक्युरिटीज’ने नुकताच देशातील टेलिकॉम क्षेत्रावर आधारित एक रिसर्च पेपर जारी केला आहे. या रिसर्च रिपोर्टमध्ये आगामी काळात टेलिकॉम सेक्टरमध्ये अनेक सकारात्मक घडामोडी घडणार आहेत. लवकरच मोबाईल डेटा पॅक २०-२५ टक्के महागण्याची शक्यता आहे. याआधी या ‘बीओएएफ सेक्युरिटीज’ने मोबाईल डेटा पॅक १० ते १५ टक्के महागण्याची शक्यता व्यक्त केली होती. डेटा पॅक वाढवून टेलिकॉम कंपन्या फायबर ब्रॉडबँड, एंटरप्रायजेस, डेटा सेंटर ऑफरिंग यांच्यात गुंतवणूक करू शकतात. लवकरच जिओचा आयपीओ येण्याची शक्यता आहे. यामुळेदेखील टेलिकॉम क्षेत्रात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.
आगामी काळात मोबाईल डेटा पॅक महागण्याची शक्यता ‘बीओएएफ’ने व्यक्त केली आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी आपापल्या डेटा पॅकमध्ये वाढ केली होती. तसाच प्रकार निवडणुकीनंतर घडण्याची शक्यता ‘बीओएएफ’ने व्यक्त केली आहे. ग्राहकांना २० ते २५ टक्के टेरिफ प्लॅन्समध्ये वाढीची झळ बसू शकते. चार जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर टेरिफ प्लॅन्सवर निर्णय होण्याची शक्यता आहे. ‘बीओएएफ’ ने जारी केलेल्या रिपोर्टनुसार डेटा पॅक एकदा महागल्यानंतर ग्राहकांना त्याची हळूहळू सवय होते. टेलिकॉम कंपन्यांनी फाईव्ह जी सेवा देण्यासाठी मोठा खर्च केला आहे. काही कंपन्या आजही ट्रायल बेसिसवर मोफत फाईव्ह जी डेटा देतात. हाच खर्च वसूल करण्यासाठी कंपन्या आगामी काळात टेरिफ प्लॅन्स वाढवण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास लवकरच सामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *