25 ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार असून यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तयारी तरत आहे. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर लागणाऱ्या ईव्हीएम, कंट्रोल युनिट, बी.यू.युनिट, व्ही.व्ही. पॅट मशीन्स सीलबंद करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. तसेच मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षणही आज राम गणेश गडकरी रंगायतन व डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह येथे पार पडले.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील 148 ठाणे विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर लागणाऱ्या ईव्हीएम, कंट्रोल युनिट, बी.यू युनिट, व्ही.व्ही पॅट सील करण्याची प्रक्रिया आज जोशी बेडेकर महाविद्यालयात पार पडली.  25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या 148 ठाणे मतदारसंघात एकूण 361 मतदान केंद्रे असून या मतदान केंद्रावर लागणारे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्ही.ही पॅट मशीन्स सील करण्याची प्रक्रिया आज करण्यात आली. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक जे.श्यामला राव, 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, 148 ठाणे ‍ विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील, अप्पर तहसीलदार आसावरी संसारे उपस्थित होत्या. सदरची प्रक्रिया ही उमेदवारांच्या राजकीय प्रतिनिंधीसमक्ष पार पडली.

उद्या दिनांक 13 मे 2024 रोजी 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 146  ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर लागणाऱ्या ईव्हीएम, कंट्रोल युनिट, बी.यू युनिट, व्ही.व्ही पॅट मशीनची सीलबंद करण्याची प्रक्रिया येथे तर 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर लागणाऱ्या मशीन्सची सीलबंद प्रक्रिया 13 ते 15 मे 2024 पर्यत चालणार आहे. 150 ऐरोली विधानसभा व 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर लागणाऱ्या मशीन्स सीलबंद करण्याचे काम 13 व 14 मे या दोन दिवशी होणार आहे.

मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी,कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण राम गणेश गडकरी रंगायतन व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे दोन सत्रात पार पडले. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी सर्व ठिकाणी भेट देवून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *