ठाणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या १४ मे रोजी ठाण्यातील तलावपाळी परिसरात ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांची 14 मे रोजी जयंती आहे. ठाणे ओबीसी एकीकरण समिती, ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे शहरातील मासुंदा तलाव, रंगो बापूजी गुप्ते चौक, चिंतामणी ज्वेलर्सच्या समोर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे. या जयंतीनिमित्त मासुंदा तलाव येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सायंकाळी ६ वाजता मासुंदा तलाव परिसरात शिवप्रदक्षिणा करण्यात येणार आहे. या प्रदक्षिणेत संभाजी राजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात येणार असून ढोल ,लेझीम पथकासह हजारो नागरिक सहभागी होणार असल्याचे ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *