अनिल ठाणेकर 

ठाणे : भिवंडीतील महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी दिली आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची या मतदारसंघात शहापूर, वाडा, भिवंडी व मुरबाड या चार तालुक्यांत बऱ्यापैकी व वाढती ताकद आहे. या सर्व तालुक्यांतून, आणि विशेषतः शहापूर व वाडा तालुक्यांतून, माकपचे कार्यकर्ते हातात लाल बावटे घेऊन आणि लाल स्कार्फ घालून मोठ्या संख्येने आले होते. सभेतील मविआच्या प्रमुख वक्त्यांना त्याची दखल घ्यावी लागली.रविवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी-पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश म्हात्रे (उर्फ बाळ्या मामा) यांच्या प्रचारासाठी वासिंद, ता. शहापूर, जि. ठाणे येथे प्रचंड सभा झाली. भिवंडी लोकसभा मतदारसंघात ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांचे भाग येतात. येथे मुख्य लढत मविआचे सुरेश म्हात्रे विरुद्ध भाजपचे विद्यमान खासदार आणि पंचायत राज चे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यामध्ये आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भिवंडी मतदारसंघातील शहापूर, वाडा, भिवंडी व मुरबाड या चार तालुक्यांत बऱ्यापैकी वाढती ताकद आहे. या सर्व तालुक्यांतून, आणि विशेषतः शहापूर व वाडा तालुक्यांतून, माकपचे कार्यकर्ते हातात लाल बावटे घेऊन आणि लाल स्कार्फ घालून मोठ्या संख्येने सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत आले होते. सभेतील मविआच्या प्रमुख वक्त्यांना त्याची दखल घ्यावी लागली. जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, उमेदवार सुरेश म्हात्रे, तसेच स्थानिक नेत्यांची भाषणे झाली. सर्व वक्त्यांनी मोदी-शहा-प्रणित भाजप केंद्र सरकारच्या सर्वच क्षेत्रांतील दिवाळखोरीवर, तसेच शिंदे-फडणवीस-अजित पवार राज्य सरकारच्या अनैतिक व भ्रष्ट कारभारावर आसूड ओढले. वक्त्यांनी मांडले की देशभर आणि महाराष्ट्रातही या निवडणुकीचे वारे भाजपच्या विरुद्ध वाहू लागले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात जनविरोधी, धनिकधार्जिणे, हुकूमशाही, धर्मांध आणि भ्रष्ट अशा भाजपच्या मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भिवंडीतून मविआचे सुरेश म्हात्रे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन सर्वांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *