अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी 14 मे पासून

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघात नियुक्तीस असलेल्या अत्यावश्यक सेवेतील मतदार व निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदार यांनी नमुना १२ डी भरून दिला आहे. त्यांचे मतदान पोस्टल वोटिंग सेंटर (पीव्हीसी) येथे तर त्या ज्यांनी नुमना 12 भरून दिला आहे, त्यांचे मतदान सुविधा केंद्र (एफ.सी) येथे होणार आहे. यासाठी भिवंडी लोकसभा मतदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोस्टल वोटिंग सेंटर व मतदान सुविधा केंद्र सुरू केले असून या मतदारांना दि. 14 ते 19 मे या कालावधीत मतदान करता येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाकडे यांच्याकडील  दिनांक 31 ऑक्टोबर 2023 परिपत्रकनुसार पोस्टल  वोटिंग व मतदान सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी 23  भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरील या मतदारांच्या मतदानाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.

पोस्टल वोटिंग सेंटर

138 कल्याण पश्चिम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, मुंबई युनिव्हर्सिटी उपकेंद्र, वसंत व्हॅली रोड, खडकपाडा कल्याण पश्चिम येथे दिनांक 14, 15,16 मे रोजी सकाळी 9 ते 5 या दरम्यान मतदान होणार आहे.

23 भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, एस. टी.स्टँड समोर भिवंडी येथे दिनांक 17,18,19 मे रोजी सकाळी 9 ते 5 या दरम्यान मतदान केंद्र सुविधा केंद्रात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील मतदार, निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदारांनी या मतदान सुविधा केंद्रामध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे.

ठाणे : भारत  निवडणूक आयोगाने अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 25- ठाणे लोकसभा मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या तसेच निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दि. 14 मे 2024 ते 19 मे 2024 या कालावधीत टपाली मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली.

नोंदणीकृत मतदार- पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी,अग्निशमन दल, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 ड भरुन दिला आहे, त्यांचे टपाली मतदान दि. 14 मे 2024, दि. 15 मे 2024 व दि. 16 मे 2024 या कालावधीत “प्रशिक्षण केंद्र, जिल्हा विकास उद्योजक केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे प 400601 येथे सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत होणार आहे.

तसेच ‍निवडणूक कामी कर्तव्यावर असलेले व अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी ज्यांनी नमुना 12 भरुन दिला आहे, अशा कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान दि. 17 मे 2024,‍ दि. 18 मे 2024 व  दि. 19 मे 2024 या दिवशी प्रशिक्षण केंद्र, जिल्हा विकास उद्योजक केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे प. – 400601 येथे  सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

तरी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त झालेले अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांनी आपले मत नोंदवून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन 25- ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे  यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *