पटणा : बिहारमधील भाजपचा चेहरा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचं दीर्घ आजाराने निधन झालेय. 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मागील सात महिन्यापासून कॅन्सरसोबत त्यांचा लढा सुरु होता. सुशीलकुमार मोदी आजारपणामुळे लोकसभा प्रचारावेळी उपस्थित नव्हते. त्यांनी याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती.
बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी सुशील कुमार मोदी यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. “भाजपचे वरिष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आपल्यात राहिले नाहीत. संपूर्ण भाजप परिवारासह माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी ही मोठी हानी आहे. आपल्या संघटन कौशल्यासह प्रशासकीय समज आणि सामाजिक राजकीय विषयांवर आपल्या सखोल माहितीसाठी ते कायम लक्षात राहतील. असे सिन्हा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
सुशील कुमार यांच्या निधनामुळं बिहारमधील भाजपचा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
