मुंबई : राज्यात आज चौथ्या टप्यात ११ लोकसभेच्या मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मतदानाची जी टक्केवारी समोर आली आहे त्यानुसार राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक सरासरी ६०.६० टक्के मतदान झाले आहे. आज नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघासाठी मतदान झाले. विशेष म्हणजे या नंदुरबार मतदार संघात प्रचाराच्या अंतिम टप्पात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या सभेला विक्रमी गर्दी झाली होती. या पार्श्वभुमीवर या मतदान टक्केवारीमुळे काँग्रेसच्या गोटात आनंद व्यक्त केल जाता आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५२.६३ टक्के तर देशात ६२.६४ टक्के मतदान झाले
पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये पाच वाजेपर्यंत ४४.९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. काँगेसचे धंगेकर यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा पेठमध्ये सर्वाधिक ५१.०७ टक्के मतदान झालेय, तर शिवाजीनगरमध्ये सर्वात कमी ३८.७३ टक्के मतदानाची नोंद झाली. औरंगाबाद मतदार संघामध्ये पाच वाजेपर्यंत ५४.०२ टक्के मतदान झालेय. सहा विधानसभा मतदारसंघामध्ये ५० टक्केंपेक्षा जास्त मतदान झालेय. वैजापूरमध्ये सर्वाधिक ५६.२९ टक्के मतदान झालं आहे.
पाच वाजेपर्यंत शिरुरमध्ये ४३.८९ टक्के मतदान झाले आहे. आंबेगाव वगळता एकाही विधानसभामध्ये ५० टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले नाही. आंबेगावमध्ये ५३.७१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हडपसरमध्ये सर्वात कमी ३८.०४ टक्के मतदान झालं आहे. तर : पाच वाजेपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ४६.०५ टक्के मतदान झालेय. पनवेल, कर्जत, चिंचवड आणि पिंपरीमध्ये ५० टक्केंपेक्षा कमी मतदान झाले आहे. उरण आणि मावळमध्ये 50 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
मतदार संघांची टक्केवारी
नंदुरबार – ६०.६०
जळगाव – ५१.९८
रावेर – ५५.३६
जालना – ५८.८५
औरंगाबाद – ५४.०२
मावळ – ४६.०३
पुणे – ४४.९०
शिरूर – ४३.८९
अहमदनगर – ५३.२७
शिर्डी – ५२.२७
बीड – ५८.२१