विशेष
रमेश कृष्णराव लांजेवार
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे इ.स.१६५७ रोजी पुरंदर येथे झाला आणि हिंदवी स्वराज्यात तेजस्वी तारा प्रगट झाला.राजपुत्र असल्यामुळे रणांगणातील मोहीम व राजकारणातील डावपेच यांचा संपूर्ण अभ्यास अवगत होता.त्याचप्रमाणे लहानपणापासूनच ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे मोठे धनी होते. संभाजींना लहानपणापासूनच अनेक कठीणायीचा सामना करावा लागला.संभाजी महाराज लहान असतांनाच त्यांच्या आई महाराणी सईबाई यांचे निधन झाले आणि त्यांच्या काळजावर मोठा आघात झाला.या आघातापासुन सावरण्यास राजमाता जिजाबाई यांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी व रक्षणासाठी शूरवीर संभाजी नावाचा महामेरू उभा केला. संभाजींची सावत्र आई पुतळाबाई यांनी आपल्या मुलासारखी वागणुक देवुन वटवृक्षाचे काम केले.परंतु त्यांची दुसरी सावत्र आई सोयराबाई यांनी संभाजीराजांच्या रस्त्यात बाभळीचे काटे रोवुन पोरकेपणाची वागणुक दिली व महाराजांच्या राजकीय कारकीर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. संभाजीच्या मनात लहानपणापासूनच आपण स्वराज्यासाठी काहीतरी केले पाहिजे.या उद्देशाने त्यांनी राजकारणातील संपूर्ण बारकावे आत्मसात केले. मुगलांच्या घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले.त्याचप्रमाणे संस्कृतसह इतर आठ भाषांचे ज्ञान त्यांना अवगत होते.याचा फायदा भविष्यात व्हावा या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले.त्यावेळी संभाजीराजे फक्त ९ वर्षाचे होते.शिवाजी महाराज औंरंगजेबाच्या नजरकैदेतुन निसटल्यानंतर त्यांना संभाजींची चिंता वाटू लागली.औंरंगजेब आगबबुला झाला अशा वेळी संभाजीराजे स्वराज्यात सुखरूप पोहचावे या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून मोगलांच्या डोळ्यात धुळ झोकून संभाजींना महाराष्ट्र सुखरूप पोहचण्याचा मार्ग मोकळा केला.इ.स.१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या १२ दिवसातच राजमाता जिजाऊचे निधन झाले आणि पुन्हा संभाजींना मोठा जब्बर धक्का बसला.त्यानंतर त्यांच्याकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही.कारण शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.छत्रपती संभाजीं महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतरन करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज व मोगल सत्ताधाऱ्यांचा कडाडून विरोध केला.औरंगजेबाने इ.स.१६८२ साली मराठ्यांवर हल्ला केला.औरंगजेब सैन्य, दारूगोळा, हत्ती-घोडे याबाबतीत बलशाली होता.कारण औरंगजेबाचे सैन्य संभाजीं महाराजांच्या तुलनेत ५ पटीने अधिक होते.त्याकाळी जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यामध्ये औरंगजेबाचा समावेश होता. तरीही संभाजीं महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला.त्याचप्रमाणे संभाजीं महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याच्या सिद्धी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना जोरदार धडा शिकवला.त्यामुळे संभाजीं महाराजांच्या विरूद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत कोणाचीही झाली नाही. कारण त्याकाळी संभाजीं म्हणजे एक वादळी तुफान होते. त्यामुळेच संभाजीं महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांनी मोठ्या शिताफीने झुंज दिली.इ.स.१६८९ च्या सुरूवातीला संभाजीं महाराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणातील संगमेश्वर येथे बोलावले.१ फेब्रुवारी इ.स.१६८९ रोजी संभाजीं महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने नागोजी माने यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला.मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यात मोठी चकमक झाली.मराठ्यांचे संख्याबळ कमी असल्याने शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाही.त्यामुळे शत्रूने संभाजीं महाराजांना व त्यांच्या सोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.अशाही परीस्थितीत महाराजांना वाचविण्याचा प्रयत्न मराठ्यांनी केला.परंतु ते त्यात यशस्वी झाले नाहीत.पहिला प्रयत्न जोत्याजी केसरकर यांनी केला. यानंतर अप्पा शास्त्री यांनी देखील केला.परंतु दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले व संभाजीं महाराज औंरंगजेबाच्या तावडीत सापडले.औरंगजेबाच्या तावडीत सापडल्या नंतर औंरंगजेबाने महाराजांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती केली.परंतु त्यांनी आपल्या धर्माचे पालन करत इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे राज्याचा संपूर्ण खजाना आमच्या स्वाधीन करावा अशी अट घातली तेही संभाजीं महाराजांनी मान्य केली नाही.संभाजी राजांचा धीटपणा आणि स्वराज्याच्या प्रती प्रेम पाहून औंरंगजेब तिलमिला झाला आणि तेव्हा पासून संभाजीं महाराजांना यातना देण्यास सुरुवात केली. तरीही औंरंगजेबाची कोणतीही अट माणन्यास व त्यांच्या सामोरं यत्किंचितही झुकण्यास महाराज तयार नव्हते.संभाजी महाराजांनी औरंगजेबाला खडसावून सांगितले की स्वराज्याच्या रक्षणासाठी व प्रजेच्या हितासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. यासाठी माझे प्राण गेले तरी चालेल. अशी सिंह गर्जना ऐकताच औंरंगजेबाने संभाजीं महाराजांना कठोर यातना देण्यास सुरुवात केली.औरंगजेबाने महाराजांचे डोळे काढले, महाराजांची जीभ कापली, महाराजांवर अतोनात वार करण्यात आले.हे सगळं संभाजीं महाराज ४० दिवस सहन करीत होते. तरीही मराठा साम्राज्यासाठी लढत रहाले. एवढ्या छळाने सुध्दा औंरंगजेबाचा आत्मा शांत झाला नाही. शेवटी औंरंगजेबाने आपली संपूर्ण क्रृरतेची हद पार केली व ११ मार्च १६८९ रोजी महाराजांचे हात-पाय, आणि त्यांचे सर्व देह शरीरापासून वेगळे करून त्यांची क्रृरतेने हत्या करण्यात आली.शेवटी औंरंगजेब हताश होऊन म्हणतो की ‘माझ्या पोटी असा शूरवीर, धाडसी पुत्र का जन्माला का आला नाही?”याची खंत त्याला मरेपर्यंत सतावत होती.शत्रूला हेवा वाटेल असे महान कार्य संभाजीं महाराजांनी केले व जगाच्या इतिहासात कमी वयात म्हणजे ३२ व्या वर्षी स्वराज्याच्या व प्रजेच्या रक्षणासाठी बलिदान देणारा राजा म्हणून संभाजीं महाराजांसमोर आज सर्वच नतमस्तक होतात.संभाजी महाराजांना बलिदान दिनानिमित्त निमित्त कोटी कोटी प्रणाम. महाराष्ट्र हा शूर वीरांचा व धर्मवीरांचा आहे.याची जान आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे.त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून राज्यातील भ्रष्टाचार, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, आरोग्य , शिक्षण इत्यादी समस्याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे.यामुळे जनतेला (प्रजेला)सुख-समाधान प्राप्त होईल.कारण आज आपण जो मोकळा श्वास घेतो व हसतो-बागडतो आहोत तो छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुंण्यायीमुळेच.हीबाब आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे.महाराष्ट्र ही संतांची, शुर वीरांची, थोर महात्म्यांची व क्रांतीकारकांची पावणभुमि आहे.याची जोपासना आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी करने अत्यंत गरजेचे आहे.धर्मवीरांनी महाराष्ट्र घडवीण्यासाठी बलीदान दिले.परंतु आजचा राजकीय पुढारी गरीब, सर्वसामान्य, शेतकरी यांचे रक्त भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पीत आहे.याची खंत धर्मवीर संभाजी महाराज, साधुसंत, थोर पुरुष, क्रांतीकारक व आपले पुर्वज यांना अवश्य होत असेल.त्यामुळे कोणत्याही महापुरुषांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही याची काळजी आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी घेतली पाहिजे व संभाजीं महाराजांचे आदर्श सामोरं ठेऊन पुढील वाटचाल व्हायला हवी.यातच आपल्याला धर्मवीर संभाजी महाराज दिसून येईल.आज बदलत्या हवामानामुळे प्रदूषणाच्या विळख्यात संपूर्ण पृथ्वी आहे.तीला वाचविण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून युध्दपातळीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हायला हवे.कारण आज लावलेले वृक्ष शेकडो काळ टिकेल. याच वृक्षांच्या पाणात, फुलात, फळात व जळामुळात संपूर्ण थोर महात्म्याचे व शुरविरांचे दर्शन अवश्य होईल.त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील संपूर्ण गडकिल्ले सुसज्जित करून पर्यटनासाठी मोकळी करावीत. कारण गडकिल्ले महाराष्ट्राची आण-बाण-शान आहे. त्यामुळे त्यांची जपणूक केलीच पाहिजे. यामुळे नवीन पिढीला संपूर्ण गडकिल्ल्यांचा इतिहास समजण्यास सुलभ जाईल आणि शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा इतिहास सहज समजूत येईल.कारण याच गडकिल्ल्यात महाराष्ट्राची संपूर्ण खरी संस्कृती दडलेली आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा. हर हर महादेव!