ठाणे : 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 39 सूक्ष्म निरीक्षक मतदारसंघात दाखल झाले असून ते केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांच्यासाठी काम करणार आहेत.
मतदारसंघात दाखल झालेल्या या सूक्ष्म निरीक्षकांना आज त्यांच्या कर्तव्याबाबत, मतदान यंत्र हाताळणीबाबत, तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन, निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते, पदनिर्देशित अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते उपस्थित होत्या. सूक्ष्म निरीक्षक दि. 20 मे 2024 रोजी मतदानाच्या दिवशी होणाऱ्या मतदान प्रक्रियेचा अहवाल निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री. मनोज जैन यांना सादर करतील.